महिला व बालविकास विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती!
रिक्त पदांचा तपशील:
- अंगणवाडी सेविका: ५६३९
- अंगणवाडी मदतनीस: १३२४३
- एकूण पदे: १८८८२
भरती प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या भरतीची घोषणा केली आहे. राज्यभरातील अंगणवाड्यांमध्ये मदतनीस आणि अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर जाहिराती काढण्यात आल्या आहेत.
अर्ज कसा करावा?
अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे दिली आहेत:
आवश्यक कागदपत्रे:
आवश्यक कागदपत्रे यादी येथे पहा
- तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके (स्वयं-साक्षांकित प्रती)
- १२ वी (HSC) उत्तीर्ण प्रमाणपत्र (अनिवार्य)
- पदवी/पदव्युत्तर प्रमाणपत्र (असल्यास)
- डी.एड./बी.एड. प्रमाणपत्र (असल्यास)
- MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र (असल्यास)
- अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून २ वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- आधार कार्ड
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया:
- जाहिरात काळजीपूर्वक वाचा. [लवकरच जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल]
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
- अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावा.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: जाहिरातीत नमूद केली जाईल.
अधिक माहिती:
- जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटला भेट द्या.
- महिला व बालविकास विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.