माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ, रायगड अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, ग्रंथालय लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर, तंत्रज्ञ, शिपाई इत्यादी पदांचा समावेश आहे. एकूण २० रिक्त पदांकरिता ही भरती केली जाणार असून, पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
रिक्त पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: सहाय्यक प्राध्यापक – ११ पदे, ग्रंथालय लिपिक – १ पद, प्रयोगशाळा सहाय्यक (केमिस्ट्री) – १ पद, प्रयोगशाळा परिचर (केमिस्ट्री) – २ पदे, आयटी तंत्रज्ञ – १ पद, प्रयोगशाळा सहाय्यक – २ पदे आणि शिपाई – २ पदे.
पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पहावी.
थेट मुलाखतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०२ मे २०२५ रोजी डी.टी. तटकरे महाविद्यालय, माणगाव, जि. रायगड – ४०२१०४ या पत्यावर उपस्थित रहावे.
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात अवश्य पहा.