लाडकी बहीण योजनेत ५ लाख महिला अपात्र, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती, लाडकी बहीण योजनेत ‘या’ ५ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी: २ लाख ३० हजार
- ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या: १ लाख १० हजार
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या: १ लाख ६० हजार
- नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी
- स्वेच्छेने योजनेतून माघार घेणाऱ्या महिला
👉👉यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
एकूण अपात्र महिलांची संख्या: ५ लाख
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
👉👉लाडकी बहिण यादी जाहीर
योजनेविषयी माहिती
- जुलै २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती.
- या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जातात.
- आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत.
अपात्र ठरण्याची कारणे
- संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असणे.
- वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असणे.
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असणे.
- नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असणे.
- स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. अपात्र ठरलेल्या महिलांना वगळण्यात आले असले, तरी पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील.