Maharashtra Prison Department Result 2025
पुणे कारागृह विभागाच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून निकालाची PDF फायली डाऊनलोड करू शकतात. परीक्षेची तारीख व इतर तपशीलही अधिसूचनेत दिलेले आहेत.
परीक्षा आणि निकालाबाबत महत्त्वाची माहिती:
- भरती प्रक्रिया: कारागृह शिपाई (पश्चिम विभाग) भरती 2022-23
- एकूण पात्र उमेदवार: 7712
- लेखी परीक्षा तारीख: 09 एप्रिल 2025
- परीक्षा केंद्र: पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे
- उत्तरतालिका (Answer Key): प्रथम उत्तरतालिका जाहीर झाली होती, त्यानंतर आक्षेप तपासून अंतिम उत्तरतालिका 15 एप्रिल 2025 रोजी प्रकाशित करण्यात आली.
- गुणतक्ता: लेखी परीक्षेला उपस्थित 7473 उमेदवारांचे गुण आता उपलब्ध आहेत.
आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया:
- शेवटची तारीख: 23 एप्रिल 2025, सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत
- स्थळ: पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे
- आवश्यक कागदपत्रे:
- OMR Sheet ची मुळ कार्बन प्रत
- लेखी परीक्षेचे ओळखपत्र
- टीप: OMR Sheet ची मुळ प्रत नसल्यास आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत.