ISRO Bharti 2025 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागांसाठी भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागांसाठी भरती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत ISRO Telemetry, Tracking and Command Network मार्फत सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 63 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदांची तपशीलवार माहिती ISRO Bharti 2025

  • सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics): 22 जागा
  • सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical): 33 जागा
  • सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science): 08 जागा

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी संबंधित शाखेतील B.E/B.Tech पदवी (किमान 65% गुणांसह) आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी GATE 2024 किंवा GATE 2025 परीक्षा दिलेली असावी.

  • इलेक्ट्रॉनिक्ससाठी: B.E/B.Tech (Electronics & Communication)
  • मेकॅनिकलसाठी: B.E/B.Tech (Mechanical)
  • कॉम्प्युटर सायन्ससाठी: B.E/B.Tech (Computer Science)

वयोमर्यादा

19 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची वयातील सूट आहे.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी: ₹250/-

महत्त्वाची तारीख

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

महत्त्वाच्या लिंक्स

Leave a Comment