बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 115 पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत “कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू” या विविध पदांसाठी एकूण 115 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुंबई येथील असून शेवटची तारीख 6 मे 2025 आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरतीचे संपूर्ण तपशील
- भरतीचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2025
- एकूण पदसंख्या: 115
- पदांची नावे:
- कार्यक्रम समन्वयक – 24 जागा
- आहारतज्ञ – 33 जागा
- कार्यकारी सहाय्यक – 02 जागा
- डेटा एन्ट्री ऑपरेटर – 30 जागा
- एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू – 26 जागा
- नोकरी ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र
- वेतनश्रेणी:
- कार्यक्रम समन्वयक: रु. 40,000/-
- आहारतज्ञ: रु. 30,000/-
- कार्यकारी सहाय्यक: रु. 30,000/-
- डेटा एन्ट्री ऑपरेटर: रु. 18,000/-
- एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू: रु. 17,000/-
शैक्षणिक पात्रता
- कार्यक्रम समन्वयक: M.B.B.S./BAMS/BHMS/BDS किंवा सार्वजनिक आरोग्य / DHA / CHA मध्ये पदविका / पदव्युत्तर पदवी.
- आहारतज्ञ: डाएटेटिक्समध्ये B.Sc. पदवी व न्यूट्रिशन आणि डाएटेटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा.
- कार्यकारी सहाय्यक: वाणिज्य, विज्ञान, कला, कायदा किंवा तत्सम शाखेत पदवी.
- डेटा एन्ट्री ऑपरेटर: कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT व टायपिंग परीक्षा उत्तीर्ण.
- एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू: माध्यमिक शालांत परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण (उच्च/कनिष्ठ स्तर).
वयोमर्यादा
- कार्यक्रम समन्वयक: 65 वर्षे (निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्षे)
- आहारतज्ञ: 40 वर्षे (निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी 62 वर्षे)
- कार्यकारी सहाय्यक: 38 वर्षे
- डेटा एन्ट्री ऑपरेटर: 45 वर्षे
- एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू: 45 वर्षे
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह 6 मे 2025 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
महत्वाची तारखे
- मुलाखत तारीख: 6 मे 2025