IOCL ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदांसाठी 1770 जागांची भरती

IOCL अप्रेंटिस भरती 2025: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मार्फत विविध ट्रेड्समध्ये “ट्रेड अप्रेंटिस” आणि “टेक्निशियन अप्रेंटिस” या पदांसाठी एकूण 1770 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961/1973 अंतर्गत IOCL च्या रिफायनरीजमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी www.iocl.com या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज सादर करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

या भरतीअंतर्गत ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट), फिटटर, बॉयलर, सेक्रेटेरियल असिस्टंट, अकाउंटंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर (फ्रेशर व स्किल सर्टिफिकेट होल्डर) तसेच टेक्निशियन अप्रेंटिस – केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रुमेंटेशन अशा विविध शाखांमध्ये पदे उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित पदासाठी १०वी/१२वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: 31 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांसाठी ५ वर्षांची, इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ३ वर्षांची वय सवलत लागू आहे.

निवड प्रक्रिया: या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड ही संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेतील एकूण टक्केवारीच्या आधारे, कमी ते जास्त अशा क्रमाने केली जाणार आहे.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख: 3 मे 2025 सकाळी 10:00 वाजता
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 जून 2025 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत

महत्वाच्या लिंक्स

Leave a Comment