SBI CBO bharti 2025 – SBI बँकेत 2964 पदांची भरती

SBI CBO bharti 2025 – SBI बँकेत 2964 पदांची भरती

भारतीय स्टेट बँक (State Bank of India – SBI) द्वारे सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 2964 जागा भरल्या जाणार असून त्यामध्ये 2600 नियमित व 364 बॅकलॉग जागांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून, पात्रतेच्या अटी पूर्ण करून ऑनलाइन अर्ज भरावा.

या भरतीसाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे, तसेच बँकिंग क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा 30 एप्रिल 2025 रोजी 21 ते 30 वर्षे दरम्यान असावी. SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे व OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे सवलत देण्यात येईल. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असेल.

अर्ज शुल्क General/OBC/EWS प्रवर्गासाठी ₹750/- इतके आहे. SC/ST/PWD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. ही परीक्षा जुलै 2025 मध्ये होण्याची शक्यता असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2025 आहे.

महत्वाचे लिंक्स

Leave a Comment