मुंबई मध्ये बस चालक – वाहक पदासाठी २८,३२५ पगाराची नोकरी । लगेच अर्ज करा
BEST मुंबई (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अॅन्ड ट्रान्सपोर्ट उपक्रम) मार्फत बस चालक आणि बस वाहक (पुरुष) पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन (ई-मेलद्वारे) किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज प्रक्रिया २९ मे २०२५ पासून सुरू झाली असून, शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
या भरतीअंतर्गत मुंबई शहरातील बस आगारांमध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत. बस चालक पदासाठी दरमहा रुपये २८,३२५/- आणि बस वाहक पदासाठी दरमहा रुपये २२,१०२/- एवढे वेतन देण्यात येईल.
महत्त्वाच्या लिंक

पात्रता (Eligibility)
- बस चालक:
- किमान आठवी उत्तीर्ण
- प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहन चालविण्याचा परवाना आणि बॅज अनिवार्य
- किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक
- बस वाहक (पुरुष):
- किमान दहावी उत्तीर्ण
- प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र यांच्याकडून जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज अनिवार्य
भरती प्रक्रिया
उमेदवारांची निवड चाचणी व/किंवा मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज सादर करताना जाहिरातीत दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- ई-मेल: recruitment@mutspl.com
- डाक पत्ता:
१२५, पहिला मजला,
वडाळा उद्योग भवन,
नायगाव क्रॉस रोड, वडाळा,
मुंबई – ४०००३१ - मोबाईल क्रमांक:
बस चालक: ८६५७००१७२५
बस वाहक: ८६५७००१७७३
(संपर्क वेळ: सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००)
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: २९ मे २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २९ मे २०२५ पासून शक्य तितक्या लवकर