लाडक्या बहिणींच्या खात्यात मे आणि जून चे 3000/- रुपये एकत्र येणार? पहा कधी मिळणार हप्ता
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत मे 2025 चा 1500 रुपयांचा हप्ता महिलांना कधी मिळणार याबाबत अनेक महिला उत्सुक आहेत. सध्या यासंदर्भात सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्र्यांची स्वाक्षरी
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ३.३७ कोटी रुपयांच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. या निधीतून महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे.
मागील अनुभव
या योजनेचे हप्ते पूर्वी अनेक वेळा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
पैसे उशिरा मिळाल्यास
जर मे महिन्याचा हप्ता वेळेवर मिळाला नाही, तर जून महिन्यात एकत्र 3000 रुपये (मे + जून) जमा होण्याची शक्यता आहे.
अर्जांची पडताळणी
या योजनेसाठी अर्जांची पुन्हा तपासणी सुरू झाली आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द होऊ शकतात. त्यामुळे काही महिलांना हप्ता मिळणार नाही.
हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता
मे महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता आहे. जूनमध्ये वटपौर्णिमेच्या सुमारास एकत्रित रक्कम (3000 रुपये) जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
अधिकृत घोषणा नाही
मे महिन्याच्या हप्त्याबाबत अजून कोणतीही सरकारी घोषणा झाली नाही. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम व चिंता आहे.