राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी 7% डी.ए वाढीचा मोठा निर्णय!, जून महिन्याच्या वेतनासोबत थकबाकी ही मिळणार
महागाई भत्त्यात 7% वाढ
राज्यातील बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तब्बल 7 टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय राज्याचे मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे बस महामंडळातील कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.
वाढीव डी.ए जुन महिन्याच्या पगारासोबत
सदर वाढीव डी.ए. (महागाई भत्ता) जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंमल जुन 2025 महिन्याच्या वेतनासोबत केला जाणार आहे. डी.ए. वाढीची थकबाकी निधीच्या उपलब्धतेनुसार दिली जाणार आहे, याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल.
वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेचा पर्याय उपलब्ध
बस महामंडळ कर्मचाऱ्यांना आता ‘धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपुर्ती योजना’ किंवा ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ या दोघांपैकी एका योजनेची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मोफत प्रवासात वाढ
सध्याच्या नियमांनुसार बस महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ९ महिन्यांसाठी मोफत प्रवास सुविधा दिली जाते. आता या कालावधीत ३ महिन्यांची वाढ करून एकूण १२ महिन्यांची मोफत प्रवास सुविधा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.