गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) मध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) पदांसाठी भरती, 21,700 रुपये ते 69,100 रुपये

गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) मध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) पदांसाठी भरती, 21,700 रुपये ते 69,100 रुपये

IB Security Assistant Bharti 2025 : भारत सरकारच्या गृहमंत्रालय अंतर्गत गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) मध्ये सुरक्षा सहाय्यक (मोटर वाहतूक) या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 455 रिक्त पदे भरण्यात येणार असून सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भरतीची जाहिरात थेट इंटेलिजेंस ब्युरो, भारत सरकार द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे किमान १०वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर LMV (मोटार कार) साठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये इतके मासिक वेतन दिले जाणार आहे. त्यामुळे स्थिर व चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

भरतीसाठी अर्ज पद्धती ऑनलाईन (Online) ठेवण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज फक्त गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in किंवा NCS पोर्टल www.ncs.gov.in द्वारेच करता येणार आहेत.

उमेदवारांचे वय अर्ज करताना 18 ते 27 वर्षे या मर्यादेत असणे आवश्यक आहे. ही भरती कायमस्वरूपी (Permanent) पद्धतीने करण्यात येत असल्याने इच्छुकांनी ही संधी गमावू नये. निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धती, आरक्षण नियम, अर्ज कसा करावा, तसेच फी भरण्याची माहिती अधिकृत जाहिरातीत सविस्तर दिलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच आपले अर्ज ऑनलाइन सादर करावेत. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी अधिकृत PDF जाहिरात आणि लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment