सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी दिवाळी गोड होणार! किती वाढणार पगार?
सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक मागील काही काळापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच दरम्यान केंद्र सरकारकडून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. यंदाच्या दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना केवळ वेतनवाढीचीच नव्हे तर महागाई भत्त्यातील (DA) वाढीचीही गोड भेट मिळण्याची शक्यता आहे.
डबल गुड न्यूजची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ जाहीर केली जाऊ शकते. या वाढीचा थेट फायदा १.२ कोटींहून अधिक कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात जादा रक्कम येणार असल्याने त्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहे.
DA मध्ये किती वाढ होणार?
सध्या कर्मचाऱ्यांना ५५ टक्के महागाई भत्ता मिळतो. महागाईच्या वाढत्या दराचा विचार करता, या भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर ही वाढ प्रत्यक्षात झाली, तर कर्मचाऱ्यांना दसरा-दिवाळीसारख्या सणांसाठी अधिक खर्च करण्याची सोय उपलब्ध होईल.
मासिक वेतनात किती फरक पडेल?
महागाई भत्त्यात वाढ झाली तर त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ५०,००० रुपये असेल, तर त्याला दरमहा सुमारे ३,००० रुपयांची वाढ मिळेल. त्यामुळे वार्षिक पातळीवर कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय फरक पडणार आहे.
महागाई भत्त्याची गणना कशी होते?
महागाई भत्त्याचा दर हा ग्राहक किंमत निर्देशांक (CPI-IW) च्या आकडेवारीच्या आधारे ठरवला जातो. या निर्देशांकात झालेल्या चढ-उतारानुसार DA मध्ये वाढ अथवा घट केली जाते. त्यामुळे महागाईचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येतो.