Viral Video Of Elephant Chase : सोशल मीडियावर व्हायरल! मुलांच्या बाइकचा हत्तीने घेतला पाठलाग, पाहा थरारक व्हिडिओ

Viral Video Of Elephant Chase : सोशल मीडियावर व्हायरल! मुलांच्या बाइकचा हत्तीने घेतला पाठलाग, पाहा थरारक व्हिडिओ

सोशल मीडियावर नेहमीच विविध प्राण्यांचे गमतीदार आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुत्रा, मांजर, तर कधी वन्य प्राणी यांच्या व्हिडिओंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या मात्र एका हत्तीचा धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो पाहून लोक हैराण झाले आहेत.

हत्तीचा अचानक हल्ला

सोशल मीडियावर s_city__ नावाच्या यूजरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, घनदाट झाडीतून एक मोठा हत्ती रस्त्यावर धावत येतो. त्याच वेळी दोन मुले बाइकवरून त्या रस्त्याने जात असतात. हत्ती त्यांना पाहताच अचानक त्यांच्या दिशेने धाव घेऊ लागतो.

घाबरलेली मुलं बाइक सोडून पळाली

हत्तीच्या धावण्याचा वेग पाहून ती दोन्ही मुले भेदरून जातात. ते बाइक वळवून पळण्याचा प्रयत्न करतात, पण हत्ती जवळ येत असल्याने ते ताबडतोब आपली बाइक रस्त्यातच सोडून जंगलाकडे धावत सुटतात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की आपला जीव वाचवण्यासाठी दोघेही मुलं बाइक सोडून जीवाच्या आकांताने पळ काढतात.

व्हिडिओने नेटकऱ्यांना केले थक्क

व्हिडिओच्या शेवटी हत्ती बाइकजवळ थांबलेला दिसतो आणि अजूनही तो पाठलाग करत असल्याचे जाणवते. हा धक्कादायक प्रकार पाहून सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया उसळल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल १५ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत, तर हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका यूजरने लिहिले, “अशा घटना पाहून लोक मोठ्याने हसतात, पण जर हे आपल्या कुटुंबासोबत घडले असते तर तुम्ही हसलात का? किती दुःखद आहे.” तर दुसऱ्याने फक्त हत्तीचे इमोजी पोस्ट केले आहेत. काहींनी तर या धाडसी व्हिडिओसाठी कॅमेरामनचे कौतुक करत “कॅमेरामन नेव्हर डाइज” असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ नेटकऱ्यांसाठी थरारक अनुभव ठरला आहे. प्राण्यांच्या अनपेक्षित वर्तनामुळे माणसांचे जीव किती धोक्यात येऊ शकतात, याची जाणीव या व्हायरल व्हिडिओमधून स्पष्टपणे होते.

Leave a Comment