एस.टी. बस च्या तिकीट दरात वाढ, जाणुन घ्या नवीन तिकीट दर
प्रवासभाडे टप्प्यानुसार (रुपयांत)
सेवेचा प्रकार | सध्याचे दर (प्रौढ) | नवीन दर (प्रौढ) | नवीन दर (मुले) |
---|---|---|---|
साधी (साधी, मिडी) | ८.७० | १०.०५ | ०६.०० |
जलद (साधारण बस) | ८.७० | १०.०५ | ०६.०० |
रात्रसेवा (साधारण बस) | ८.७० | १०.०५ | ०६.०० |
निमआराम | ११.८५ | १३.६५ | ०८.०० |
विनावातानुकुलीत शयन+आसनी | ११.८५ | १३.६५ | ०८.०० |
विनावातानुकुलीत शयनयान | १२.८५ | १४.७५ | ०८.०० |
शिवशाही (वातानुकुलीत) | १२.३५ | १४.२० | ०८.०० |
जनशिवनेरी (वातानुकुलीत) | १२.९५ | १४.९० | ०९.०० |
शिवनेरी (वातानुकुलीत) | १८.५० | २१.२५ | १२.०० |
ई-बस (९ मीटर वातानुकुलीत) | १२.०० | १३.८० | ०८.०० |
ई-शिवाई / ई-बस (१२ मीटर वातानुकुलीत) | १३.२० | १५.१५ | ०९.०० |
ग्रामीण सेवांचे सुधारीत प्रवास भाडे दर (२५ जानेवारी २०२५ पासून लागू)
👉👉New maruti suzuki: मारुती सुझुकी 5 स्टार रेटिंग सह नवीन रुपात बाजारात
महत्त्वाचे मुद्दे
- रात्रसेवा: साध्या बससेवेचेच भाडे घेतले जाईल.
- वातानुकुलीत सेवेसाठी ५.५०% प्रवासीकर विचारात घेतलेला आहे.
- अपघात सहाय्यता निधी: भाड्यामध्ये समाविष्ट असून वेगळा आकारला जाणार नाही.
- भाडे: प्रत्येक टप्प्याचे भाडे रुपया १/- च्या पटीत निश्चित करावे.
ठोक भाडे
- ज्या मार्गांवर ठोक भाडे पद्धत लागू आहे, त्या मार्गांवरील दर विभागांमध्ये समसमान ठेवावेत.
- ठोक भाड्याचे अंतिम स्थान निश्चित करावे आणि कोणत्याही परिस्थितीत एकाच मार्गावर भाड्यात किंवा बसस्थानकात तफावत राहू नये.
सर्वसामान्य बदल
- प्रवासभाड्यात कोणताही अतिरिक्त शुल्क आकारला जाणार नाही.