बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! 10000/- रू. चा भांडी संच मोफत, अर्ज करणे सुरू
तालुका सुविधा केंद्रातील डेटा एन्ट्री सेवा बंद
मंडळाच्या आदेशानुसार दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रांमध्ये डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना आपले नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध लाभांचे अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया
👉👉अर्ज करण्यासाठी येथे व्हिडिओ पाहा
- अधिकृत वेबसाइट mahabocw.in वर जा.
- “Construction Worker: Registration” वर क्लिक करा.
- आधार कार्ड क्रमांक व मोबाईल नंबर टाकून “Proceed to Form” वर क्लिक करा.
- 1 रुपयाचा शुल्क भरून अर्ज सक्रिय करा.
👉👉बांधकाम कामगार योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- अर्ज भरणे:
बांधकाम कामगार आपल्या सोयीच्या ठिकाणावरून अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरू शकतात. - कागदपत्र पडताळणीसाठी तारीख निवड:
अर्ज सबमिट केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी कामगारांनी सोयीची तारीख निवडणे आवश्यक आहे.
- तारीख निवडीची सुविधा:
दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पासून कामगारांना कागदपत्र पडताळणीसाठी तारीख व सुविधा केंद्र निवडण्याची सुविधा दिली जाईल. - कागदपत्र पडताळणी:
निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह संबंधित सुविधा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे. ठरलेल्या तारखेस हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल.
👉👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कागदपत्र पडताळणीसाठी तारीख व जागा निवडण्याची प्रक्रिया:
ज्यांनी आधी IWBMS प्रणालीत कागदपत्र पडताळणीसाठी तारीख घेतली असेल, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. अशा कामगारांनी खालील प्रक्रियेचा अवलंब करावा:
- “Change Claim Appointment Date” वर क्लिक करा:
- अधिकृत वेबसाइटवर “Change Claim Appointment Date” या बटनावर क्लिक करा.
- नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा:
- तुमचा नोंदणी क्रमांक भरल्यानंतर रजिस्टर केलेल्या मोबाईलवर OTP येईल.
- OTP पडताळणी:
- OTP प्रविष्ट करून पडताळणी पूर्ण करा.
- अर्जाचा पोच क्रमांक भरा:
- ज्या लाभाच्या अर्जासाठी तारीख बदलायची आहे त्याचा पोच क्रमांक प्रविष्ट करा.
- तारीख व सुविधा केंद्र निवडा:
- कागदपत्र पडताळणीसाठी सुविधा केंद्र आणि सोयीची तारीख निवडा.
- अर्ज सबमिट करा:
- सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज प्रणालीत सबमिट करा.
महत्वाची सूचना
ठरलेल्या तारखेस व ठिकाणी उपस्थित न राहिल्यास अर्ज नामंजूर केला जाईल. त्यामुळे वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
कोणाला लाभ मिळणार?
ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी करून अर्ज केला आहे व अर्ज पात्र ठरले आहेत, त्यांना मोफत भांडी संच वितरण होईल. जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसल्यास, लवकरात लवकर नोंदणी करून योजनेचा लाभ मिळवावा.
मोफत भांडी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
मोफत भांडी योजनेसाठी अर्ज ऑफलाईन करावा लागतो. अर्ज केल्यानंतर कामगारांना त्यांच्या मोबाइलवर संदेश येतो. जर एकापेक्षा जास्त कामगारांनी अर्ज केला असेल, तर त्यांना संबंधित ठिकाणी बोलावून आधार बायोमेट्रिक प्रक्रिया केली जाते. अर्ज पात्र ठरल्यास मोफत भांडी संच मिळतो.