भूमी अभिलेख नवीन वेबसाईट : ७/१२ उतारा, ८ उतारा, क-पत्रक, जमीन मोजणी व प्रॉपर्टी कार्ड सर्व सेवा ऑनलाईन

भू अभिलेख : सातबारा, ८अ, फेरफार आदींसह अन्य सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (Bhumi Abhilekh) या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात. यातील काही सेवा मोफत आहेत तर काही सेवांना शुल्क आकारले जाते.

👉👉सविस्तर माहितीसाठी येथे व्हिडीओ पाहा👇👇

यामध्ये सातबारा उतारा (Satbara) असेल 8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणी यासह सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा (Online Service) उपलब्ध आहेत. आता भूमि अभिलेखची नवीन वेबसाईट उपलब्ध झाली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला नेमकं काय काय पाहता येणार आहे. जाणून घेऊयात या सविस्तर लेखातून…

👉👉भूमी अभिलेख नवीन वेब साइट येथे पहा

१. मोफत सेवा

  • वेबसाईट: https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  • सेवा: गाव नमुना नंबर, सातबारा, 8 अ, 8 ड, मालमत्ता पत्रक
  • सातबारा पाहण्याची प्रक्रिया:
    1. वेबसाईटवर जाऊन सातबारावर क्लिक करा.
    2. जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
    3. गट नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून माहिती मिळवा.
    4. कॅप्चा कोड टाकून सातबारा पाहा.

२. शुल्क आकारल्या जाणाऱ्या सेवा

  • वेबसाईट: https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  • सेवा: सातबारा उतारा, 8 अ, मालमत्ता पत्रक, फेरफार प्रत, मालमत्ता फेरफार अर्ज, फेरफार स्थिती इत्यादी.
  • शुल्क: या सेवांसाठी काही शुल्क आकारले जाते.
  • फेरफार प्रक्रिया: या वेबसाईटवर तुम्ही मालमत्ता फेरफार देखील करू शकता.

३. दोन्ही वेबसाईटमधील फरक

  • पहिली वेबसाईट (bhulekh.mahabhumi.gov.in) मोफत सेवा पुरवते.
  • दुसरी वेबसाईट (bhumiabhilekh.maharashtra.gov.in) शुल्क आकारून सेवा पुरवते.

४. महत्वाचे

  • दोन्ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट आहेत.
  • जमीन मालक आणि नागरिकांसाठी या वेबसाईट खूप उपयोगी आहेत.

Leave a Comment