RTE Lottery Result date 2025-26 : ‘आरटीई’ प्रवेशाची पहिली यादी या तारखेला होणार जाहीर

RTE Lottery Result date 2025-26 : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE Act 2009) राज्यातील खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी मोफत प्रवेश दिला जातो.

RTE Lottery Result date 2025-26

  • राज्यभरातून RTE राखीव जागांसाठी 3 लाख 5 हजार 159 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.
  • महाराष्ट्र राज्यात आरटीई अंतर्गत 1 लाख 9 हजार 111 राखीव जागा आहेत.
  • राज्यस्तरावर लॉटरीची ऑनलाईन सोडत दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी काढण्यात आली आहे.
  • RTE Lottery Result date 2025-26 ची पहिली यादी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिनांक 14 फेब्रुवारी पासून मुलांच्या पालकांना मेसेज (SMS) पाठविण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाइट : RTE लॉटरी यादी येथे पाहा

पालकांसाठी महत्त्वाची सूचना

ज्या मुलांचे लॉटरीत नंबर लागेल, त्यांच्या पालकांना त्यांच्या अर्जात नमूद केलेले सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यासाठी जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, मुलाचे आधारकार्ड, आर्थिक उत्पन्न गटातील पालकांना एक लाखाच्या आतील उत्पन्न प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अधिक माहिती

  • RTE List जाहीर झाल्यानंतर, निवड झालेल्या मुलांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे माहिती दिली जाईल.
  • आरटीई प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी, आपण शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

👉अधिकृत वेबसाइट येथे पहा

Leave a Comment