Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी मदतनीस पदांच्या जागांसाठी भरती जाहीर

Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, खालील दिलेल्या जिल्हा अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा सामान्य प्रवर्गासाठी 18 ते 35 वर्षे ठेवण्यात आली असून विधवा महिलांसाठी कमाल वयाची मर्यादा 40 वर्षे आहे. तसेच, SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
PDF जाहिरातयेथे जाहिरात पहा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा

उमेदवार अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाइन (ई-मेलद्वारे) पाठवू शकतात. ऑफलाइन अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी (सिव्हिल) कार्यालय, 30 गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी, देवपूरजवळ, धुळे – 424002 या पत्त्यावर पाठवावा, तर ऑनलाइन अर्ज cdpodhule@gmail.com या ई-मेलवर पाठवता येईल. उमेदवारांची निवड लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सुरुवात 3 एप्रिल 2025 पासून होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2025 आहे. अधिक माहिती व जाहिरात पाहण्यासाठी उमेदवारांनी https://dhule.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

Leave a Comment

व्हॉट्स ॲप ग्रुप जॉइन करा