राज्यात अंगणवाड्यांमध्ये १० हजार पदांची भरती – जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या १०० कलमी कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांमध्ये सेविका आणि मदतनीस पदांसाठी तब्बल १० हजार पदांची भरती होणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने या भरतीसाठी मान्यता दिली आहे. ही भरती प्रक्रिया ५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन २० मार्चपर्यंत चालणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भरतीची माहिती
सोलापूर जिल्ह्यात १६ प्रकल्पांमधील अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये सेविका आणि मदतनीस पदांसाठी खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहे:
- अक्कलकोट प्रकल्प: २५ सेविका, ४९ मदतनीस
- बार्शी प्रकल्प: २३ सेविका, २४ मदतनीस
- वैराग प्रकल्प: १४ सेविका, १५ मदतनीस
- करमाळा प्रकल्प: ७ सेविका, २९ मदतनीस
- माढा प्रकल्प: १४ सेविका, १० मदतनीस
- कुर्डुवाडी-टेंभुर्णी प्रकल्प: २ सेविका, ६ मदतनीस
- माळशिरस प्रकल्प: २ सेविका, १०५ मदतनीस
- अकलूज प्रकल्प: ४ सेविका, १४ मदतनीस
- मंगळवेढा प्रकल्प: ३ सेविका, ६ मदतनीस
- मोहोळ प्रकल्प: ३ सेविका, १५ मदतनीस
- उत्तर सोलापूर प्रकल्प: १४ सेविका, ७ मदतनीस
- पंढरपूर प्रकल्प: २२ सेविका, ८२ मदतनीस
- सांगोला प्रकल्प: ५ सेविका, ७ मदतनीस
- कोळा प्रकल्प: ४ सेविका, ८ मदतनीस
- दक्षिण सोलापूर प्रकल्प: ९ सेविका, ३९ मदतनीस
शैक्षणिक पात्रता आणि महत्त्वाचे निकष
- सेविका पदासाठी: उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असावे.
- मदतनीस पदासाठी: शैक्षणिक पात्रतेविषयी लवकरच सूचना जारी केल्या जाणार आहेत.
- विशेष संधी: ऑगस्ट २०२२ पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिलांनी बारावी उत्तीर्ण केली आहे, त्यांना सेविका पदासाठी संधी दिली जाणार आहे.
भरती प्रक्रिया कशी होईल?
- ५ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करुन शैक्षणिक कागदपत्रांद्वारे होणार भरती प्रक्रिया होणार आहे, जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज मागवले जातील.
- उमेदवारांची निवड शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे केली जाईल.
- २० मार्चपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या अधिकार्यांनी या भरती प्रक्रियेसंदर्भात स्पष्टता दिली असून इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.