BEST मुंबई भरती 2025 : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) अंतर्गत बस चालक आणि बस वाहक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मुंबई शहरात करण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
बस चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्याकडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहन परवाना आणि बॅज असावा. यासोबतच किमान दोन वर्षांचा प्रवासी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. बस वाहक पदासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, बस वाहकाचा परवाना व बॅज महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून प्राप्त असावा.
बस चालक पदासाठी दरमहा CTC ₹25,000/- इतके वेतन देण्यात येईल तर बस वाहक पदासाठी दरमहा CTC ₹22,102/- वेतन निश्चित करण्यात आले आहे. उमेदवार अर्ज ऑनलाइन (ई-मेलद्वारे) किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकतात. ऑनलाइन अर्जासाठी ई-मेल पत्ता recruitment@mutspl.com असा आहे. तसेच ऑफलाइन अर्जासाठी पत्ता आहे – १२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव क्रॉस रोड, वडाळा, मुंबई – 400031.
अर्ज प्रक्रिया 5 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून, उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरती प्रक्रिया लेखी चाचणी आणि/किंवा मुलाखतीच्या आधारे होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि अर्जासंबंधित सूचना जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट www.bestundertaking.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. जाहिरात PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक माहिती किंवा शंका असल्यास, उमेदवार खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकतात – बस चालक: 86570 01725 आणि बस वाहक: 86570 01773.