Bombay high court bharti 2025 : बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२५ अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर “माळी/मदतनीस” पदासाठी ही भरती होत आहे. एकूण ०१ रिक्त पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/ वर जाऊन सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मुंबई उच्च न्यायालय भरती Bombay high court bharti 2025
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अर्जाचा नमुना | अर्जाचा नमुना डाउनलोड करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
या भरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने जाहिरात पाहणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे गरजेचे आहे. या पदासाठी वेतनश्रेणी रुपये १६,६००/- ते ५२,४००/- असून, त्यासोबत महागाई भत्ता व इतर शासकीय नियमानुसार भत्ते देय असतील.
वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२५ आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,
P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई – ४०००३२