सरकारी कर्मचारी/पेन्शन धारकांना दिवाळीपुर्वीच 4 टक्के डी.ए वाढ; वित्त विभागाची मंजूरी ..
केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदवार्ता!
दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA) वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात वित्त मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात लाखो कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
वित्त मंत्रालयाची तयारी सुरू
जुलै 2025 पासून लागू होणाऱ्या डी.ए वाढीबाबत वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी तयार करण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. या आकडेवारीच्या आधारे प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेटसमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी व पेन्शनधारकांना वाढीव भत्त्याचा लाभ देण्यात येईल.
4 टक्के वाढीची शक्यता
जानेवारी ते जून 2025 या कालावधीतील ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) च्या आकडेवारीचा विचार करता यावेळी 4 टक्के महागाई भत्ता वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सध्या मिळत असलेला भत्ता आणखी वाढून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी निर्णय अपेक्षित
महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय दिवाळी सणापूर्वीच घेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. यानंतर ऑक्टोबर महिन्याचे पगार व पेन्शन (जे नोव्हेंबरमध्ये मिळणार आहेत) त्यातच वाढीव भत्ता जोडला जाण्याची शक्यता आहे.
एकूण डी.ए होणार 59 टक्के
सध्या 55 टक्के दराने महागाई भत्ता लागू आहे. जुलै 2025 पासून 4 टक्के वाढ झाल्यास एकूण महागाई भत्ता 59 टक्क्यांवर जाईल. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन आणखी वाढून आर्थिक दिलासा मिळेल.