या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी – महागाई भत्त्यात 4% वाढ!

या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी – महागाई भत्त्यात 4% वाढ!

नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम बंगाल सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4 टक्के वाढ जाहीर केली आहे.

पश्चिम बंगाल सरकारचा महत्त्वाचा निर्णय

पश्चिम बंगालच्या वित्तमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी विधानसभेत 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सामाजिक कल्याण योजना, कृषी विकास, आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या 10 लाखांहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना फायदा होईल. ही वाढ 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. यामुळे त्यांचा एकूण महागाई भत्ता 18% पर्यंत वाढेल.

केंद्र सरकारकडूनही मोठी घोषणा होण्याची शक्यता

केंद्र सरकारही लवकरच महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीच्या शेवटी किंवा होळीपूर्वी (मार्चच्या पहिल्या आठवड्यात) केंद्र सरकार 3% वाढ जाहीर करू शकते.

जर सरकारने DA 3% ने वाढवला, तर तो एकूण 56% होईल. केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी महागाई भत्ता वाढवते. त्यामुळे यंदाही फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा

कोविड काळात महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नव्हता, त्यामुळे अनेक कर्मचारी नवीन वाढीची प्रतीक्षा करत आहेत. यंदा आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली असून, तो 2026 पासून लागू होईल. त्याआधी सरकार कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देऊ शकते.

यामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल.

Leave a Comment