District court bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालयात सफाईगार पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सदर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात मधील अटी व शर्ती नक्की वाचा, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2025 आहे.
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सफाईगार (Cleaner) पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 06 पदे उपलब्ध असून, इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याचा पत्ता प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, (न्यायमंदिर), आकाशवाणी चौक, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४० ००१ असा आहे.
ही भरती प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत या टप्प्यांतून होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 7 वी उत्तीर्ण असावा, तसेच त्याला शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी आणि हिंदी भाषांमध्ये लेखन, वाचन आणि संभाषण करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2025 आहे. अधिक माहितीसाठी https://nagpur.dcourts.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. नोकरीचे ठिकाण नागपूर असेल.