पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार 2025 मध्ये या पिकांच्या नोंदणीकरिता शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि.17.06.2025 पासून दि.30.06.2025 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत GR | Fruit Crop Insurance 2025
Fruit Crop Insurance 2025:पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्षे, लिंबू, संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरिता शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि.१७.०६.२०२५ पासून दि.३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.
१. कृषी व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. फवियो-२०२४/प्र.क्र.८१/१०-अ, दि.१२.६.२०२४
२. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र फ-क्र.१३०१२/१०/२०१६-क्रेडिट-॥ (व्हीओएल.), एफटीएस-१४०१५२, दि.१७.०६.२०२५

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा तेही मोबाईलवर | Mp land records
राज्य पुरकपत्र :
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात मृग व आंबिया बहारामध्ये सन २०२४-२५, सन २०२५-२६ या २ वर्षांमध्ये संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्षे, लिंबू, संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणी /सहभागाची अंतिम मुदत दि.१४.०६.२०२५ अशी निश्चित करण्यात आलेली आहे.
२. तथापि, शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन, योजनेत सहभागी होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्र.
(२) येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरुन, पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजने अंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्षे, लिंबू, संत्रा व पेरू या पिकांच्या नोंदणीकरिता शेतक-यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दि.१७.०६.२०२५ पासून दि.३०.०६.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

मात्र या वाढीव मुदतीत योजनेच्या कार्यान्वयनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमधील तरतूदींचे काटेकोर पालन करुन अंमलबजावणीतील नैतिक धोके, तसेच लाभार्थ्यांच्या चुकीच्या निवडीची जोखीम टाळण्याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी.
सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिध्दी व प्रचार मोहिम राबवावी.
३. सदर शासन पुरकपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२५०६२०१३४४५२९२०१ असा आहे. सदर पुरकपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,