वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, व प्रयोगशाळा परिचर व इतर पदांची भरती । अर्ज करणे सुरू
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड (GMC Nanded) येथे “गट ड” संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण ८६ रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २५ एप्रिल २०२५ पासून १६ मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट (www.drscgmcnanded.in) वरून सादर करावेत.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
पदांची नावे:
शिंपी, धोबी, स्ट्रेचर बेअरर, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी, स्वयंपाकी सहाय्यक, एक्स-रे सेवक, कॅज्युअल्टी सेवक, डिस्पेन्सरी सेवक, शिपाई, टेबल बॉय, पुरुष सेवक, मेस सेवक, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, व प्रयोगशाळा परिचर.
एकूण जागा:
८६ पदे
शैक्षणिक पात्रता:
- गट ड पदांसाठी: कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाची १०वी उत्तीर्ण.
- स्वच्छक (Cleaner) पदासाठी: ७वी उत्तीर्ण आवश्यक.
- तसेच, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- खुला प्रवर्ग: कमाल ३८ वर्षे
- राखीव प्रवर्ग: कमाल ४३ वर्षे
नोकरी ठिकाण:
नांदेड
पगार श्रेणी:
- गट ड (वर्ग ४) सर्वसाधारण पदांसाठी: ₹१५,००० – ₹४७,६००
- प्रयोगशाळा परिचर साठी: ₹१९,९०० – ₹६३,२००
भरती प्रक्रिया:
ऑनलाईन परीक्षा द्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹१०००/-
- राखीव प्रवर्ग: ₹९००/-
महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: २५ एप्रिल २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ मे २०२५