राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वित्त विभागाकडून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय GR जारी दि. :- 02/06/2025

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वित्त विभागाकडून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय GR जारी दि. :- 02/06/2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासनाच्या वित्त विभागाने 2 जून 2025 रोजी एक महत्त्वाचा आणि दिलासा देणारा शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, खुल्लर समितीने शिफारस केलेल्या पदांना सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे.

संपूर्ण शासन निर्णय GR येथे पहा

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202506021638384105.pdf

राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी : वित्त विभागाकडून सुधारित वेतनश्रेणी संदर्भात शासन निर्णय GR जारी दि. :- 02/06/2025

वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशींना मान्यता

2024 मध्ये गठीत वेतन त्रुटी निवारण समितीने आपल्या अहवालात काही शिफारसी केल्या होत्या. या शिफारसींना शासनाने मंजुरी दिली असून, त्यानुसार जोडपत्र क्रमांक 01 ते 03 या शासन निर्णयात समाविष्ट करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

  • जोडपत्र 01 मधील पदांना सुधारित वेतनश्रेणी 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिक (notional) स्वरूपात लागू होईल.
  • प्रत्यक्ष आर्थिक लाभ मात्र 1 जून 2025 पासूनच दिला जाईल.
  • 1 जानेवारी 2016 ते 31 मे 2025 या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्याला वेतनातील तफावत म्हणून थकबाकी देण्यात येणार नाही.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूचना

  • जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 ते 31 मे 2025 दरम्यान सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांचे वेतन सुधारित वेतनश्रेणीनुसार काल्पनिकरित्या निश्चित करण्यात येणार आहे.
  • तसेच, त्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन सुधारीत पद्धतीने सेवानिवृत्तीच्या तारखेपर्यंत पुन्हा ठरवले जाईल.
  • मात्र, या सुधारणांचा आर्थिक लाभ 1 जून 2025 पासूनच लागू होईल आणि मागील काळातील थकबाकी देण्यात येणार नाही.

Leave a Comment