IDBI Bank Bharti 2025 : IDBI बँकेमध्ये 676 रिक्त पदांसाठी भरती; कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी पास
IDBI Bank Bharti 2025 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI Bank) अंतर्गत “ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड O” पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 676 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून, पात्र उमेदवारांनी https://www.idbibank.in/ या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया 8 मे 2025 पासून सुरू होणार असून 20 मे 2025 ही अंतिम तारीख आहे.
या भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवी (General/OBC/EWS साठी 60% गुण, SC/ST/PH साठी 55% गुण) प्राप्त केलेली असावी. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा ही 20 ते 25 वर्षांदरम्यान असून, SC/ST प्रवर्गाला 5 वर्षे व OBC (Non-Creamy Layer) प्रवर्गाला 3 वर्षांची सूट दिली जाईल.
रिक्त पदांचे वर्गवारीनुसार विवरण:
UR – 271, OBC – 124, EWS – 67, SC – 140, ST – 74
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांद्वारे होणार आहे.
- ऑनलाईन टेस्ट (Online Test)
- कागदपत्र पडताळणी (Document Verification)
- वैयक्तिक मुलाखत (Personal Interview)
- पूर्व-नियुक्ती वैद्यकीय चाचणी (Pre-Recruitment Medical Test)
परीक्षा शुल्क
- खुला/ OBC/ EWS प्रवर्ग: ₹1050/- (अर्ज शुल्क + माहिती शुल्क)
- SC/ST/PWD प्रवर्ग: ₹250/- (फक्त माहिती शुल्क)
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 8 मे 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 मे 2025
- संभाव्य ऑनलाईन परीक्षा तारीख: 8 जून 2025 (रविवार)
महत्वाचे लिंक