Imd update : राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा

Imd update : राज्यात विजांसह ६० किमी वेगाने वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा!

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसाठी जोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि दक्षिण कर्नाटकमध्ये २७ मेपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात मान्सून २६ मे रोजी दाखल झाला आहे.

पुढील ३ तास अत्यंत महत्वाचे

काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किमीपर्यंत असू शकतो. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

दक्षिण भारतातही पावसाचा जोर

उत्तर कर्नाटकात २७ ते ३० मे दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये ३१ मेपर्यंत वादळ, विजांचा कडकडाट आणि झपाट्याचे वारे राहतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

केरळमध्ये नुकसान

केरळमध्ये आतापर्यंत २९ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर ८६८ घरे अंशतः नुकसानग्रस्त झाली आहेत. ७ मे रोजी केरळ आणि माहे परिसरात वादळ, अतिवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला होता.

मुंबईत भरतीचा इशारा

आज मुंबईत भरतीचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी १२:१४ वाजता समुद्रात सुमारे ४.९२ मीटर उंचीची भरती येईल, त्यावेळी सुमारे १५ फूट उंच लाटा उसळतील. मंगळवारी रात्री ११:५४ वाजता आणखी एक ४.०८ मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता आहे. उद्याही मुंबईसाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

सावध राहा, सुरक्षित राहा!

Leave a Comment