भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 63 जागांसाठी भरती
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत ISRO Telemetry, Tracking and Command Network मार्फत सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 63 रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदांची तपशीलवार माहिती ISRO Bharti 2025
- सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics): 22 जागा
- सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical): 33 जागा
- सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science): 08 जागा
शैक्षणिक पात्रता
सर्व पदांसाठी संबंधित शाखेतील B.E/B.Tech पदवी (किमान 65% गुणांसह) आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी GATE 2024 किंवा GATE 2025 परीक्षा दिलेली असावी.
- इलेक्ट्रॉनिक्ससाठी: B.E/B.Tech (Electronics & Communication)
- मेकॅनिकलसाठी: B.E/B.Tech (Mechanical)
- कॉम्प्युटर सायन्ससाठी: B.E/B.Tech (Computer Science)
वयोमर्यादा
19 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची सूट तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची वयातील सूट आहे.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी: ₹250/-
महत्त्वाची तारीख
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025
महत्त्वाच्या लिंक्स