‘या’ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे २५ हजार अर्ज रद्द, 8वा हप्ता मिळणार नाही
महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात २५,००० पेक्षा जास्त महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा ₹१५०० ची आर्थिक मदत या योजनेतून दिली जाते.
👉👉8 वा हप्ता लाभार्थी महिला यादी जाहीर येथे पहा तुमचे नाव👈👈
२५,००० अर्ज का झाले रद्द?
महिला आणि बाल विकास विभागाने लातूर जिल्ह्यातील २५,१३६ अर्जांची तपासणी केल्यानंतर त्यांना रद्द केले आहे. या निर्णयामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी
- महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणे
- अर्जात चुकीची माहिती दिली जाणे
👉👉8 वा हप्ता लाभार्थी महिला यादी जाहीर येथे पहा तुमचे नाव👈👈
महिलांना आठवी हप्ता मिळणार नाही
महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्या महिलांच्या खात्यात आधीचे पैसे जमा झाले आहेत ते परत घेण्यात येणार नाहीत. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्ट केले की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा अधिक आहे किंवा त्या योजना पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना लाभ देणे शक्य होणार नाही.
सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने २४ जानेवारी २०२५ पासून लाडकी बहिन योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे. ३० जानेवारीपर्यंत जवळपास २ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित महिलांना पुढील दोन-तीन दिवसांत सातवा हप्ता मिळेल.