उद्यापासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज पडताळणी सुरू, ही 4 महत्वाची कागदपत्रे ठेवा तयार

Ladki bahin yojana new update : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढील काही दिवसांत अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका या अर्जांची तपासणी करणार आहेत.

👉👉लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पहा

अपात्र महिलांसाठी मोठा निर्णय

सरकारने चार चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेंतर्गत अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पुणे जिल्ह्यात तब्बल 21 लाख 11 हजार 991 महिलांनी अर्ज केले होते. मात्र, आता शासनाने निकषांमध्ये बसणाऱ्या अर्जदार महिलांनाच योजनेचा लाभ देण्याचे ठरवले आहे.

👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

महत्वाची सूचना व बैठक

महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यभरातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. परिवहन विभागाच्या मदतीने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

तपासणीशिवाय अर्ज मंजूर

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तपासणीशिवाय अनेक महिलांचे अर्ज मंजूर केले होते. मात्र आता सरकार पात्रता निकष तपासणार असून चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अर्ज तपासणी कशी होणार?

सरकारच्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी या महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करतील. अपात्र अर्जदारांची यादी जिल्हा परिषद आणि महिला व बाल विकास विभागाकडे पाठवली जाईल.

लाडकी बहीण योजनेचे निकष

योजना पात्रतेसाठी महाराष्ट्र सरकारने काही अटी ठरवल्या आहेत:

  • लाभार्थी महिला 18 ते 65 वयोगटातील असावी.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत नसावा.
  • कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर दाता नसावा.
  • कुटुंबातील कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन नसावे.

ही योजना पात्र महिलांसाठी अत्यंत लाभदायक आहे. मात्र, तपासणी प्रक्रियेने अपात्र अर्जदारांना योजनेतून वगळण्याचा शासनाचा निर्णय महिलांच्या योजनांसाठी पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा आहे.

Leave a Comment