Maharashtra Excise Department Bharti 2025 : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदे रिक्त असून, या विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. लिपिक, टंकलेखक, चालक, लेखापाल, उपअधीक्षक, जवान अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या तिजोरीत दरवर्षी हजारो कोटींचा महसूल जमा करणाऱ्या या विभागाला सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमित तपासणी तसेच अवैध मद्य उत्पादन व वाहतुकीवर कारवाई करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
सूचना: सविस्तर माहिती करिता वरील ठिकाणी दिलेली जाहिरात वाचावी नंतरच पुढील कार्यवाही करावी, इतर नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही
सध्या नाशिक विभागामार्फतच दरवर्षी अंदाजे चार हजार कोटींचा महसूल जमा केला जातो. विभागाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी मंजूर असलेल्या अनेक पदांपैकी बरीच पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढला आहे. रिक्त पदांमुळे कारवाई आणि प्रशासनाच्या कामात मर्यादा येत आहेत. राज्य शासनाने या भरती प्रक्रियेला गती देणे आवश्यक असून, त्यामुळे विभाग अधिक सक्षम होईल व महसूलवाढीला अधिक चालना मिळेल.