Maharashtra Police Recruitment 2025 | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 बाबत महत्त्वाचे शासन परिपत्रक जारी! जिल्ह्यानुसार पदांची यादी पहा

Maharashtra Police Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो राज्यातील लाखो तरुण आणि तरुण साठी एक आनंदाची बातमी आहे कारण की राज्यांमध्ये लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या संदर्भात महत्त्वाची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे.

पोलीस भरती 2025 संदर्भातील महत्त्वाचे शासन परिपत्रक व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचून घ्या.

पोलीस भरती – २०२४-२०२५ ची पूर्व तयारी बैठक उपरोक्त विषयास अनुसरुन पोलीस भरती २०२४-२०२५ च्या संदर्भात अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७/०४/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की, खालील नमूद अधिकारी यांनी सदर बैठकीकरिता सोबत जोडलेल्या सहपत्रानुसार आवश्यक ती माहितीसह सदर बैठकीसाठी उपस्थित रहावे.

खाली दिलेली माहिती महाराष्ट्र पोलीस दलातील विविध विभागांतील रिक्त पदांबाबत माहिती अधिकारांतर्गत आणि वृत्तपत्रांतील माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे:

पोलीस विभागांतील रिक्त पदे

विभागपदरिक्त पदे
पोलीस शिपाई (एकूण)पोलीस शिपाई4842
पोलीस वाहन चालक787
नवी मुंबईपोलीस शिपाई102
मुंबई लोहमार्ग पोलीसपोलीस शिपाई504+279 = 783
पिंपरी चिंचवडपोलीस शिपाई595
मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयपोलीस शिपाई654
पोलीस वाहन चालक80
ठाणे पोलीस आयुक्तालयपोलीस शिपाई382
रायगडपोलीस शिपाई71+4 = 75
छत्रपती संभाजी नगरपोलीस शिपाई189
नाशिक शहरपोलीस शिपाई64+7 = 71
नांदेडपोलीस शिपाई129
वर्धापोलीस शिपाई202
नागपूर ग्रामीणपोलीस शिपाई393
नागपूर शहरपोलीस शिपाई1039
सातारापोलीस शिपाई76
चंद्रपूरपोलीस शिपाई198
अमरावती पोलीसपोलीस शिपाई221
हिंगोलीपोलीस शिपाई51
लातूरपोलीस शिपाई11+17 = 28

SRPF (State Reserve Police Force) गटांतील रिक्त पदे

गट क्रमांकस्थानरिक्त पदे
गट 1पुणे48
गट 5दौंड31
गट 10सोलापूर60
गट 11नवी मुंबई37
गट 13विसोरा34
अमरावती (भारतीय राखीव बल)210

नोंद: ही सर्व माहिती माहिती अधिकारांतर्गत आणि वृत्तपत्रांतील प्रकाशित बातम्यांनुसार आहे. यात बदल होऊ शकतो.

Leave a Comment