वाढती लोकसंख्या आणि प्रशासनासाठी महाराष्ट्रात 21 नविन जिल्ह्यांची निर्मिती; जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्रात लोकसंख्येचा झपाट्याने वाढत असलेला वेग आणि ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा ठिकाणी जाण्यास लागणारा वेळ पाहता, नविन जिल्ह्यांची गरज सतत जाणवते. याच पार्श्वभूमीवर शासनाकडे अनेकदा मागण्या करण्यात आल्या असून, आता राज्यात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.
नवीन जिल्हा निर्माण का?
राज्यातील अनेक गावांमधून जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी 3-4 तास लागतात. त्यामुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना मोठा प्रवास करावा लागतो. याशिवाय लोकसंख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता टिकवण्यासाठी लहान जिल्ह्यांची आवश्यकता आहे.
विभागनिहाय प्रस्तावित नविन जिल्ह्यांची यादी
कोकण, नाशिक आणि पुणे विभाग
| सध्याचा जिल्हा | प्रस्तावित नविन जिल्हा |
|---|---|
| पुणे | शिवनेरी |
| सातारा | माणदेश |
| ठाणे | कल्याण, मीरा-भाईंदर |
| रायगड | महाड |
| रत्नागिरी | मानगड |
| जळगाव | भुसावळ |
| अहमदनगर (अहिल्यानगर) | शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर |
| नाशिक | कळवण, मालेगाव |
मराठवाडा विभाग
| सध्याचा जिल्हा | प्रस्तावित नविन जिल्हा |
|---|---|
| लातूर | उदगीर |
| नांदेड | किनवट |
| बीड | आंबेजोगाई |
विदर्भ विभाग (नागपूर आणि अमरावती विभाग)
| सध्याचा जिल्हा | प्रस्तावित नविन जिल्हा |
|---|---|
| अमरावती | अचलपूर |
| यवतमाळ | पुसद |
| भंडारा | साकोली |
| चंद्रपूर | चिमूर |
| गडचिरोली | अहेरी |
| बुलढाणा | खामगाव |
राज्यातील वाढती लोकसंख्या आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच नविन जिल्ह्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना सेवा अधिक जवळ मिळू शकेल.