NHM bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) भरती 2025 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील पुढील दिलेल्या पदांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा
pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज प्रक्रिया 04 एप्रिल 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2024 सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
मुलाखतीचे ठिकाण उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय, बाबा पेट्रोल पंप चौक, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – 431001 येथे असेल. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी मूळ आणि सत्यप्रत प्रमाणित शैक्षणिक तसेच अनुभव प्रमाणपत्रे बरोबर आणणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹150/- असून राखीव प्रवर्गासाठी ₹100/- आहे. हे शुल्क राष्ट्रीयीकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे DY DIRECTOR HEALTH SERVICES, AURANGABAD यांच्या नावे भरावे लागेल. ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांची निवड अंतिम वर्षाच्या परीक्षेतील गुण (50%), अतिरिक्त शैक्षणिक पात्रता (20%), कार्यानुभव (20%) आणि वैयक्तिक मुलाखत (10%) या निकषांवर आधारित असेल.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.arogya.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तेथून अधिकृत अधिसूचना आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांसह तो अंतिम तारखेपूर्वी प्रत्यक्ष कार्यालयात जमा करावा.