Pashusavardhan Vibhag Bharti 2025 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांना वेग देण्यासाठी आणि विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरावीत असा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ मधील एकूण 2795 पदे भरली जाणार आहेत.
सद्यस्थितीत विभागात 5684 मंजूर पदांपैकी केवळ 1886 पदे कार्यरत आहेत, तर 2798 पदे रिक्त आहेत. याशिवाय, 31 डिसेंबर 2025 पर्यंत आणखी 8 पदे सेवानिवृत्तीनंतर रिक्त होतील, यामुळे एकूण रिक्त पदांची संख्या 2806 इतकी होईल. या रिक्त पदांमुळे विभागाच्या कार्यावर परिणाम होत असल्याने, ही भरती तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले असून, आयोगाकडून लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सरळसेवा जाहिरात क्र. 12/2022 अंतर्गत प्रतिक्षायादीतील 11 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील आणि विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडले जाईल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
