Pune custom bharti 2025 : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागांतर्गत कार्यरत पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने 2025 साली विविध गट ‘क’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सीमॅन, ग्रीजर आणि ट्रेड्समॅन या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी ही सरकारी नोकरीची एक उत्तम संधी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करू शकतात.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता
सीमॅन पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजावर तीन वर्षांचा अनुभव तसेच हेल्म्समन आणि सीमनशिपचे दोन वर्षांचे काम आवश्यक आहे. ग्रीजर पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि मुख्य व सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीचा तीन वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे. ट्रेड्समॅन पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित ITI ट्रेडमधील (मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंटल, कारपेंट्री) प्रमाणपत्र व दोन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांना 5 वर्षे व अन्य मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
नोकरी ठिकाण
नोकरीचे ठिकाण पुणे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.