Railway bharti 2025 : रेल्वेमध्ये १००७ पदांसाठी भरती, भरपूर पदे..
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या नागपूर विभागात अप्रेंटिस पदासाठी 1007 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती अप्रेंटिसशिप कायदा, 1961 अंतर्गत केली जाणार आहे. नागपूर विभागासाठी एकूण 919 आणि मोतीबाग वर्कशॉपसाठी 88 जागा उपलब्ध आहेत.
pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
या भरतीत विविध ट्रेडसाठी जागा आहेत, ज्यामध्ये फिटर, कारपेंटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, COPA, स्टेनोग्राफर, प्लंबर, पेंटर, वायरमन, डीझेल मेकॅनिक, टर्नर, हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर, डिजिटल फोटोग्राफर आणि इतर काही ट्रेडचा समावेश आहे. Railway bharti 2025
शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने उमेदवाराने किमान 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे. उमेदवाराचे वय 5 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे वयाची सवलत दिली जाईल.
भरती प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क नाही. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2025 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.