रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025 – 154 पदांची भरती
रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 154 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षक, समन्वयक, के.जी. शिक्षक, संगणक शिक्षक आणि ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2025 आहे.
एकूण जागा – 154
नोकरी ठिकाण – सातारा
पदनिहाय जागा:
- मुख्याध्यापक – 07
- प्राथमिक शिक्षक – 47
- उच्च प्राथमिक शिक्षक – 28
- माध्यमिक शिक्षक – 25
- कला, नृत्य व संगीत शिक्षक – 08
- क्रीडा शिक्षक – 08
- समन्वयक – 01
- के.जी. शिक्षक – 03
- संगणक शिक्षक – 06
- ग्रंथपाल – 01
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक अर्हता संबंधित पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
निवड प्रक्रिया – उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. वरील सर्व पदे अर्धवेळ कराराधारित स्वरूपात असतील.
मुलाखतीचा पत्ता –
- अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा, ता. जि. सातारा – 415001
- आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, ता. जि. सातारा – 415001
मुलाखतीची तारीख – 27 एप्रिल 2025
महत्त्वाचे लिंक: