2025 च्या UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या छोट्याशा गावातील बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांनी मोठे यश मिळवले आहे. त्यांना परीक्षेत 551 वा क्रमांक मिळाला असून आता ते IPS अधिकारी होण्याची शक्यता आहे. त्यांची यशकथा म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी
बिरदेव यांचे शिक्षण एका अत्यंत साध्या कुटुंबातून सुरू झाले. त्यांचे वडील मेंढपाळ म्हणून मेंढ्या राखण्याचे काम करतात, तर त्यांची आई शेतमजुरी करते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असूनही त्यांनी शिक्षणाची नाळ सोडली नाही. जेव्हा upsc चा निकाल लागला त्यावेळेस बिरुदेव मेंढ्या संभाळत होते.
बिरुदेव यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले तसेच माध्यमिक शिक्षण जय महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) मधून सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली
नोकरी आणि UPSC चा प्रवास
पदवी घेतल्यानंतर त्यांनी भारतीय टपाल विभागात ‘पोस्टमन’ म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र त्यांच्या मनात UPSC ची तयारी करून काहीतरी मोठं करायचं होतं. मग त्यांनी UPSC साठी तयारी सुरू केली आणि पोस्टमनची नोकरी राजीनामा देऊन सोडली. पुढील अभ्यास कामासाठी त्यांनी दिल्लीमध्ये राहून तीन वेळा UPSC ची तयारी केली.
हलाखीची परिस्थिती होती, अनेक अडी अडचणी असूनही त्यांनी हार मानली नाही, त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात अखेर 551 वा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.
परिवाराची आणि गावाची भूमिका
UPSC चा निकाल लागल्यावर बिरदेव मेंढ्या राखत होते. त्यांना त्यांच्या मित्राकडून निकालाची बातमी कळली आणि त्यानंतर संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण पसरलं. सदरील बातमी गावकऱ्यांना समजल्या नंतर त्यांच्या घराजवळ ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं, गावकऱ्यांनी त्यांचं फेटा बांधून स्वागत केलं. आपला पोरगा IPS बनला हे पाहून आई-वडील अश्रू अनावर झाले.
प्रेरणादायी संदेश
बिरदेव यांनी यश मिळवताना सांगितले,
“जिथे संधी नाही, तिथे मेहनतच आपल्याला पुढं घेऊन जाते. परिस्थिती कितीही कठीण असो, जर निष्ठा आणि ध्येय असलं तर अशक्य काहीच नाही.”
ही कहाणी केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तर अशा हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे, जे प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन यशाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
गुर वळणारा पोरगा आज साहेब झाला! तहसीलीतला मोठा आज नायब झाला! हे गाण खरं इथं शोभतय म्हणायला हरकत नाही.