आधार कार्डावर त्वरित 50,000 रुपये कर्ज मिळवण्याची सोपी प्रक्रिया

आधार कार्ड वापरून तुम्ही 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकता. हे कर्ज कसं मिळवायचं, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा आणि कोणती कागदपत्रं लागतात, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

कोणत्या योजनेतून कर्ज मिळतं?

केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ चालवते. या योजनेतून रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळतं.

कर्जाचे टप्पे:

  • पहिल्यांदा 10,000 रुपये मिळतात.
  • ते वेळेवर भरल्यास 20,000 रुपये मिळतात.
  • नंतर 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं.

अर्ज कसा करायचा?

  • हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारी बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज भरून, आवश्यक कागदपत्रं जोडून बँकेत जमा करावी लागतील.
  • तुमची माहिती बरोबर असल्यास, कर्ज मंजूर होईल.

कोणती कागदपत्रं लागतात?

  • ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक खाते
  • तुम्ही काय काम करता याची माहिती.

महत्त्वाचे मुद्दे:

  • या कर्जासाठी कोणतीही हमी द्यावी लागत नाही.
  • कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होते.
  • हे कर्ज फक्त छोट्या व्यवसायिकांना मिळते.
  • या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.

Leave a Comment