एमपीएससी मार्फत सर्वात मोठी भरती : २७९५ जागांसाठी जाहिरात जाहीर

Mpsc bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून, यावेळी एकूण २७९५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती पशुसंवर्धन विभागाच्या गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदांसाठी होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जाहिरात पहा

पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे आणि पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विभागातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांमुळे ग्रामीण भागातील सेवा अडथळलेली होती, त्यामुळे या भरतीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.

सध्या सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ अंतर्गत एकूण ४६८४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ १८८६ पदेच भरलेली असून, २७९८ पदे रिक्त आहेत. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ८ पदे सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणार असल्याने एकूण रिक्त पदांची संख्या २८०६ इतकी आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र सादर केले आहे. त्यानंतर एमपीएससीने २७९५ पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सरळसेवा जाहिरात क्र. १२/२०२२ अंतर्गत प्रतिक्षायादीतील ११ पदे आधीच कार्यवाहीत आणली जात आहेत.

या भरती प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना अधिक चांगल्या व जलद सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती

  • पदाचे नाव: पशुधन विकास अधिकारी
  • भरती करणारी संस्था: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)
  • जागांची संख्या: २७९५
  • गट: गट अ
  • शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुसंवर्धन पदवी
  • अर्जाची मुदत: २९ एप्रिल २०२५ ते १९ मे २०२५
  • अधिक माहिती: www.mpsc.gov.in

Leave a Comment