Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामार्फत 2025 साली वाहनचालक (Staff-Car-Driver) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांतील दादरा-नगर हवेली व दमण-दीव या सर्वांचं उच्च न्यायालय म्हणून कार्यरत असलेल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये ही भरती होणार आहे. सदर भरतीची जाहिरात पुढे पाहू शकता.
pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
पदसंख्या आणि तपशील
- पदाचे नाव: वाहनचालक (Staff-Car-Driver)
शैक्षणिक पात्रता व इतर अटी
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे हलके मोटार वाहन चालवण्याचा वैध परवाना आणि किमान 3 वर्षांचा अनुभव असावा.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 21 एप्रिल 2025 रोजी 21 ते 38 वर्षांदरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत देण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण
नियुक्ती मुंबई येथे होणार आहे.
अर्ज फी
- अर्ज फी: ₹500/-
महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 मे 2025 (सायं. 05:00 वाजेपर्यंत)
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण जाहिरात वाचावी व अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी तयारी सुरू ठेवावी.