महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या 10वी व 12वीच्या परीक्षा दिलेल्या 21 लाख विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच या परीक्षा निकाल जाहीर होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर 10वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भात माहिती दिली आहे. निकालाच्या अचूक तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. अंदाजे 15 मेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक दोघांच्याही उत्सुकतेत वाढ झाली आहे.
यावर्षी 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडली होती. एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. ही परीक्षा राज्यभर 3 हजार 373 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. दुसरीकडे, 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होऊन 17 मार्चपर्यंत पार पडली.
बोर्डाने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी भरपूर वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षा वेळेपूर्वी घेतल्या आणि निकालही लवकर जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मे महिना संपण्याच्या आतच दोन्ही (10वी व 12वी) निकाल जाहीर होणार आहेत. लवकर निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी वेळेवर प्रवेश घेता येईल.
निकाल कुठे पाहता येईल?
विद्यार्थी खालील अधिकृत वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतात