कृषी विद्यापीठ, अंतर्गत “गट-ड” संवर्गातील रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५२९ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन आणि मत्स्य सहायक या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १० मार्च २०२५ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०२५ आहे.
या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांना विशेष संधी देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे वाचन करावे.