अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या ‘मे’ महिन्याचे मानधन वितरित

Anganwadi sevika may month salary : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याचे मानधन वितरित

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मे 2025 महिन्याच्या मानधनासाठी 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी यांचा पगार लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल.

केंद्र सरकारकडून निधी उशिरा मिळाल्यामुळे राज्य सरकारचा पुढाकार

एकात्मिक बाल विकास सेवा ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. मात्र, केंद्र सरकारकडून निधी वेळेवर न मिळाल्यामुळे सेविकांना मानधन उशिरा मिळत होते. ही अडचण लक्षात घेऊन 2017 साली झालेल्या बैठकीत, केंद्राचा हिस्सा मिळाला नसला तरीही राज्य सरकारकडून पगार देण्याचा निर्णय झाला होता. त्याच निर्णयाच्या आधारे राज्याने आता मे महिन्याचा मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

निधीचे तपशील (रुपयांमध्ये लाखात)

  • केंद्र सरकारचा हिस्सा (60%): ₹4200.00 लाख
  • राज्य सरकारचा हिस्सा (40%): ₹2800.00 लाख
  • राज्याचा अतिरिक्त पूर्ण हिस्सा: ₹14800.00 लाख
  • एकूण निधी: ₹21800.00 लाख
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या 'मे' महिन्याचे मानधन वितरित

हा निधी नवी मुंबई येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांनी हा निधी ठरवलेल्या नियमांनुसार खर्च करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, केंद्र सरकारकडून त्यांच्या वाट्याचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment