सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली: महत्त्वाचे परिपत्रक पहा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली: महत्त्वाचे परिपत्रक पहा

सरकारी कर्मचाऱ्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि नवीन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य, मुंबई येथील संचालक, अभियोग संचालनालयाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आले असून, ते सर्व सहाय्यक संचालक, सरकारी अभियोक्ता, तसेच परिक्षेत्रीय कार्यालयांतील सर्व उपसंचालक व कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे.

या परिपत्रकानुसार, संचालनालयाच्या आस्थापनेवरील काही कर्मचारी आणि अधिकारी हे फेसबुक, युट्युब, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, लिंक्डइन अशा समाज माध्यमांवर शासनाच्या धोरणात्मक निर्णयांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांवर, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आपली वैयक्तिक मते, टीका किंवा आक्षेप नोंदवत आहेत, असे निदर्शनास आले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली: महत्त्वाचे परिपत्रक पहा

शासकीय कर्मचारी व अधिकारी हे शासनाचा एक अविभाज्य भाग असतात. अशा वेळी त्यांनी शासनाच्या निर्णयांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक टीका करणे, हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ चे उल्लंघन आहे. ही कृती कर्मचाऱ्यांच्या सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तीवर परिणाम करणारी असून, ती अत्यंत गंभीर स्वरूपाची मानली जाईल.

म्हणूनच, संचालनालयाच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात येतात की त्यांनी कोणत्याही समाज माध्यमांवर शासनाच्या निर्णयांवर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणतीही टीका, मतप्रदर्शन अथवा आक्षेप नोंदवू नये. याचे उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

सदर परिपत्रक आपल्या अधिपत्याखालील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे. तसेच, अनुपालन अहवाल लवकरात लवकर संचालनालयाकडे सादर करण्यात यावा, असे निर्देश परिपत्रकात नमूद करण्यात आले आहेत.

Leave a Comment