Anganwadi bharti : महाराष्ट्रात अंगणवाडी केंद्रात भरती प्रक्रिया सुरू – शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण

Anganwadi bharti : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधिपत्याखालील अंगणवाडी केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या मदतनिस पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया सरळ नियुक्तीने (By Nomination) केली जाणार असून, संबंधित शहरातील स्थानिक राहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरात 1येथे क्लिक करा
जाहिरात 2येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान इयत्ता १२वी उत्तीर्ण असावा (राज्य शिक्षण मंडळ अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण). Anganwadi bharti

वास्तव्य अट: अर्ज करणारी महिला उमेदवार संबंधित नागरी प्रकल्प (नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत / महानगरपालिका क्षेत्रातील) रहिवाशी असावी. यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याचा रहिवाशी दाखला आवश्यक आहे.

वयोमर्यादा: किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३५ वर्षे. मात्र, विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहील. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा जन्म दाखल्याची प्रमाणित प्रत आवश्यक आहे.

अनुभव: उमेदवारास किमान दोन वर्षांचा अनुभव अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका किंवा मदतनिस म्हणून शासकीय यंत्रणेमध्ये असल्यासच अनुभवासाठी गुण देण्यात येतील. खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था यामधील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.

गुणांकन पद्धत: उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, सामाजिक प्रवर्ग, अनुभव, संगणक परीक्षा, विधवा/अनाथ दर्जा इत्यादी बाबींवर आधारित गुण देण्यात येतील. त्यानुसार तयार होणाऱ्या गुणानुक्रमानुसार निवड केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही.

लहान कुटुंब अट: उमेदवाराचे दोनपेक्षा जास्त हयात अपत्य नसावीत. यासाठी दिनांक २७/०२/२०२४ च्या शासन निर्णयानुसार प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.

भाषा अट: उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एका अर्हतेत मराठी विषय असणे गरजेचे आहे.

इतर बाबी:

  • उमेदवार विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला व स्वयंघोषणा आवश्यक.
  • उमेदवार अनाथ असल्यास संबंधित प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • मागासवर्गीय उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रियेबाबत सूचना:

  • प्रत्येक उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा.
  • अर्जामध्ये शहराचे नाव व पदाचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी नसलेला अर्ज, खाडाखोड असलेला अर्ज किंवा आवश्यक प्रमाणपत्रे नसलेला अर्ज अपात्र ठरेल.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल २०२५ असून, ही तारीख ओलांडल्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे, डाकाने आलेले अर्ज अमान्य ठरतील.

निवड प्रक्रिया: प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर, उमेदवारांना आक्षेप किंवा तक्रार असल्यास १० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात तक्रार दाखल करता येईल. तक्रारींची शहानिशा करून अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांची कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर नियुक्ती केली जाऊ शकते.

महत्त्वाची सूचना: अर्जामधील खोटी माहिती अथवा चुकीची कागदपत्रे दिल्यास उमेदवारी रद्द केली जाईल. निवड प्रक्रियेवर कोणताही दबाव टाकल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

Leave a Comment